कर्नाटकात काँग्रेसलाच कौल, भाजप पिछाडीवर –महासर्वे

कर्नाटकात काँग्रेसलाच कौल, भाजप पिछाडीवर –महासर्वे

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभेत काँग्रेसलाच कौल देण्यात आला असून भाजप मात्र पिछाडीवर असल्याचं दिसत आहे. लोकनीती-सीएसडीएस आणि एबीपी न्यूजने केलेल्या सर्व्हेमध्ये काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या सर्व्हेमध्ये काँग्रेसला 38 टक्के जनतेनं कौल दिला आहे तर भाजपला 33 टक्के जनतेनं कौल दिला आहे. त्यामुळे कर्नाटकातील काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर तेथील जनतेनं विश्वास दर्शवला असल्याचं दिसून येत आहे. परंतु खरी परिस्थिती ही निवडणुकीनंतरच समोर येणार आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

मतांची टक्केवारी ?

काँग्रेस : 38 टक्के

भाजप : 33 टक्के

जेडीएस+ : 22 टक्के

कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार ?

काँग्रेस : 92 ते 102 जागा

भाजप : 79 ते 89 जागा

जेडीएस : 32 ते 42 जागा

इतर : एक ते सात जागा

 मोदी सरकारबाबत जनतेचं मत

खुप चांगलं : 23 टक्के

चांगलं : 45 टक्के

वाईट : 16 टक्के

अत्यंत वाईट : 12 टक्के

लिंगायत समाजाची मतं कुणाला?

काँग्रेस : 18 टक्के

भाजप : 61 टक्के

जेडीएस : 11 टक्के

कर्नाटकातील सिद्धरमैय्या सरकारचं काम कसं आहे?

खुप चांगलं : 29 टक्के

चांगलं : 43 टक्के

वाईट : 15 टक्के

अत्यंत वाईट : 10 टक्के

सर्वात भ्रष्ट पक्ष कोणता?

काँग्रेस : 41 टक्के

भाजप : 44 टक्के

जेडीएस : 4 टक्के

COMMENTS