कर्नाटक – पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का, 5 जागांपैकी 4 ठिकाणी काँग्रेस-जेडीएस आघाडी विजयी !

कर्नाटक – पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का, 5 जागांपैकी 4 ठिकाणी काँग्रेस-जेडीएस आघाडी विजयी !

नवी दिल्ली – कर्नाटकात घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. तीन लोकसभा आणि दोन विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी शनिवार मतदान  घेण्यात आलं होतं. याचा निकाल आज लागला असून लोकसभा मतदारसंघात काँग्रेस-जेडीएस आघाडीनं दोन जागांवर बाजी मारली आहे. तर फक्त एका जागेवर भाजपला समाधान मानवं लागलं आहे. तसेच विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.

दरम्यान या निवडणुकीत हक्काचा बेल्लारी लोकसभा मतदारसंघ भाजपनं गमवला असून 14 वर्षानंतर याठिकाणी काँग्रेसनं बाजी मारली आहे. याठिकाणी मिशन कमळा राबविणाऱ्या रेड्डी ब्रदर्सला मोठा धक्का बसला आहे. बेळ्ळारीमधे श्रीरामलु यांच्या बहिणीचा पराभव झाला असून श्रीरामलु हे B.S.येडियुरप्पा यांचे निकटवर्ती सहकारी आहेत. तसेच येडियुरप्पा यांच्या हक्काच्या शिवमोगा लोकसभा मतदारसंघात मुलाला अपेक्षित लिड नाही. याठिकाणी जेडीएस- काँग्रेस एकत्र लढल्यामुळे याचा फायदा भाजपला झाला आहे. येडियुरप्पा यांना शिवमोगामध्ये अडकवुन ठेवण्यात यश आलं आहे.

कोणाचा विजय, कोण पराभूत ?

1)बेळ्ळारी लोकसभा निवडणूक

विजयी V.S.उग्रप्पा (  कोंग्रेस )

पराभूत J.शांता (BJP)

2) शिवमोगा लोकसभा

विजयी B.S. रागवेंद्रा ( BJP)

पराभूत मधू भंगाराप्पा ( JDS )

3) मंड्या लोकसभा

विजयी LR शिवरामे गौडा ( JDS  )

पराभूत Dr.सिध्दरामय्या ( BJP)

कर्नाटक विधानसभा पोटनिवडणूक

1) ऱामनगर विधानसभा मतदारसंघ

विजयी अनिथा कुमारस्वामी (JDS)

पराभव L.चंद्रशेखर ( BJP

2) जमखंडी विधानसभा मतदारसंघ

विजयी – आनंद नामेगौडा ( कोंग्रेस)

पराभूत – श्रीकांत कुलकर्णी ( BJP

एकूण 3  लोकसभा मतदारसंघपैकी पूर्वी २ जागा भाजपाकडे होत्या तर 1  J.D.S कडे होती. आत्ता १ काँग्रेस , १ भाजपा, १ J.D.S. अशी झाली आहे.परंतु याठिकाणी भाजपाची एक जागा कमी झाली आहे.

COMMENTS