मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी कुमारस्वामींचं जनतेला मोठ आश्वासन !

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी कुमारस्वामींचं जनतेला मोठ आश्वासन !

बंगळुरु  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी जेडीएसचे नेते एच डी कुमारस्वामी यांनी कर्नाटकमधील जनतेला मोठं आश्वासन दिलं आहे. जे निवडणुकीपूर्वी निर्णय घेतलेत आणि ज्या घोषणा केल्या आहेत. त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असे कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे. कर्नाटकात जेडीएस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन होत आहे. निवडणुकीत जी आश्वासने जनतेला दिली आहेत. ती पूर्ण करण्यावर आमचा भर राहणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत. ते सोडविण्यावर भर देणार असून शेतकरी हिताचे निर्णय आणि त्यांची सुरक्षा घेण्यावर आमची सर्वोच्च प्राथमिकता असणार असल्याचंही कुमारस्वामी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आज होणा-या शपथविधी सोहळ्यासाठी अनेक नेत्यांना आणि मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्रीपदी जी. परमेश्वर हे शवथ घेणार आहेत. तर विधानसभा सभापतीपदी काँग्रेसचे के. आर. ऱमेश कुमार घेणार आहेत. तसेच जेडीएसला मुख्यमंत्री पद आणि १२ मंत्रीपदं दिली जाणार असून  काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद आणि २२ मंत्री पद दिली जाणार आहेत. आज संध्याकाळी ४:३० वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे.

 

COMMENTS