कर्नाटक निवडणूक – भाजपची जोरदार मुसंडी !

कर्नाटक निवडणूक – भाजपची जोरदार मुसंडी !

कर्नाटक – संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीदरम्यान आतापर्यंत भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर सुरु असल्याचं दिसून येत आहे. तर काही जागांनी आघाडीवर असल्यामुळे भाजपची जोरदार मुसंडी सध्या दिसून येत आहे.

आतापर्यंतची आकडेवारी

एकूण – 222

भाजप -107

काँग्रेस -68

जेडीएस- 45

इतर – 02

दरम्यान 40 मतदान केंद्रावर ही मतमोजणी सुरु असून २२४ पैकी २२२ जागांसाठी १२ मे रोजी येथे मतदान झाले होते. त्यांपैकी आर. आर. नगर येथील गैरप्रकार तर जयनगर मतदारसंघात भाजप उमेदवाराचे निधन झाल्याने या दोन जागांवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.काँग्रेस आणि भाजपा या दोन प्रमुख पक्षांसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. यासाठी या दोन्ही पक्षांकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. या निवडणुकीत ज्या पक्षाला हार पत्करावी लागेल त्यांच्यासाठी मोठे नुकसान करणारा हा पराभव असणार आहे. त्यामुळे या मतमोजणीकडे सर्वांचं लक्ष लागलं असून महापॉलिटिक्सवर याबाबत प्रत्येक अपडेट आम्ही देत आहोत.

 

COMMENTS