कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळणार ?

कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसचं सरकार कोसळणार ?

बंगळुरू – कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेवर येऊ न देण्यासाठी काँग्रेस-जेडीएसनं एकत्रित येऊन सरकार स्थापन केलं. परंतु काँग्रेस जेडीएसचं हे सरकार आता जास्त काळ टिकणार नसल्याचं बोललं जात आहे. कारण मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्यावर नाराज असलेले काँग्रेसचे आमदार भाजपाला साथ देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे कुमारस्वामी सरकार अल्पमतात येणार असल्यी जोरदार चर्चा सध्या कर्नाटकमध्ये सुरु आहे.

दरम्यान सत्तास्थापनेनंतर काँग्रेस-जेडीएसमध्ये मंत्रिमंडळातील जागांवरून आणि कॅबिनेट मंत्रिपदांवरून काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी असल्याचं पहावयास मिळलं होतं. त्यानंतर आता अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे त्यांची ही नाराजीच कुमारस्वामी सरकारला महागात पडू शकते असं बोललं जात आहे. परंतु आपल्या आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी काँग्रेस नेते प्रयत्न करत आहेत. परंतु तरीही हे आमदार आक्रमक राहिले आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली तर काँग्रेस-जेडीएस सरकार अडचणीत सापडणार असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कर्नाटकमधील आगामी राजकीय घडामोडींकडे लक्ष लगालं आहे.

 

COMMENTS