कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसची – जेडीएससोबत आघाडी ?

कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेसची – जेडीएससोबत आघाडी ?

कर्नाटक – विधानसभा निवडणूक येत्या तीन ते चार महिन्यात होणार आहे. त्यासाठी जोरदार राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे कर्नाटक दौरे वाढलेले आहेत. सत्ता टिकवण्यासाठी काँग्रेस धडपडत आहे. तर पुन्हा सत्ता खेचण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा धर्मनिरपेक्ष पक्ष काँग्रेसला आणि भाजपला पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय. गेल्या आठवड्यातच जेडीएस आणि बहुजन समाज पार्टी यांनी राज्यात विधानसभेसाठी आणि लोकसभेसाठी आघाडी केली आहे. 224 जागांपैकी बहुजन समाज पार्टी 20 जागा लढवणार आहे.

जेडीएस आणि बसपा यांच्या आघाडीत आता राष्ट्रवादी काँग्रेस यांचाही समावेश होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जेडीएसचे सर्वेसर्वा एच डी देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांच्याच्याशी या संदर्भात चर्चा केली आहे. शरद पवार यांनीच याबाबच माहिती दिली. आघाडीबाबत प्राथमिक चर्चा झाली अशी माहिती पवार यांनी दिली. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीबाबत तिथल्या नेत्यांशी पवार यांनी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. राज्यात राष्ट्रवादीची फारशी ताकद नाही. त्यामुळे जेडीएससोबत निवडणूक लढवण्यास राष्ट्रवादी उत्सुक आहे.

COMMENTS