कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस अव्वल !

कर्नाटकात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस अव्वल !

बंगळुरू – राज्यात सत्ता मिळवण्यात अपयशी ठरलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत चांगलाच धक्का बसला आहे. विधानसभेत सत्ता मिळाली नाही तर नंबर एकचा पक्ष ठरलेल्या भाजपला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत मात्र दुस-या क्रमांकवर समाधन मानावं लागलंय. काँग्रेस पक्षाला 982 जागा मिळल्या असून भाजपला 929 जागा मिळाल्या आहेत. जेडीएसला 375 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांना 329 जागा मिळल्या आहेत. शहरी भागातल्या या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत तीनही पक्ष स्वबळावर निवडणूक लढले होते.

काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष होऊनही सत्तेपासून दूर रहावं लागलं होतं. त्यानंतर केवळ चार महिन्यानंतर झालेल्या या शहरी भागातील निवडणुकीत भाजपला धक्का बसला आहे. साधारणपणे शहरी भागात भाजपचं चांगलं वर्चस्व आहे. मात्र तिथेच त्यांना फटका बसला आहे. ज्या ठिकाणी त्रिशंकू स्थिती आहे. त्या ठिकाणी काँग्रेस आणि जेडीएस एकत्र येणार आहेत. आगामी लोकसभा निवढणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनीही अपेक्षेप्रमाणे भाजपला यश मिळालं नाही अशी कबुली दिली आहे. मात्र भाजप लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करेल असंही त्यांनी सांगितलं आहे.

COMMENTS