काटोल विधानसभा पोटनिवडणूक घेण्याबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

काटोल विधानसभा पोटनिवडणूक घेण्याबाबत नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय !

नागपूर – काटोल विधानसभा पोटनिवडणूक घेऊ नका असे निर्देश नागपूर खंडपीठनं निवडणूक आयोगाला दिले आहेत. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी निवडणूक घेणे म्हणजे सरकारी पैशाचा अपव्यव ठरेल म्हणून पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये अशी याचिका न्यायालयात दाखल केली गेली होती. त्यामुळे ही निवडणूक न घेण्याच निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.

दरम्यान मूळ कार्यक्रमानुसार ही पोटनिवडणूक लोकसभा निवडणुकांसह म्हणजेच काल (11 एप्रिल) व्हायला हवी होती. मात्र, निवडणुकी संदर्भात याचिका दाखल झाल्यानंतर न्यायालयाच्या अंतरिम निर्देशानुसार उमेदवारी अर्ज व इतर प्रक्रिया थांबवली गेली होती. आता न्यायालयाने यासंदर्भात निवडणूक घेण्यात येऊ नये असे निर्देश देत काटोल पोटनिवडणुकीवर पूर्णविराम दिला आहे.

COMMENTS