मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे धरणे आंदोलन मागे !

मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचे धरणे आंदोलन मागे !

नवी दिल्ली – दिल्लीमध्ये गेली नऊ दिवसांपासून सुरु असलेलं मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. आयएएस अधिकाऱ्यांचा संप मागे घेण्यासह इतर मागण्या केजरीवाल यांनी केल्या होत्या. त्यानंतर  आयएएस अधिका-यांसोबत बैठक घेतली जाणार आहे. त्यामुळे आयएएस अधिका-यांच्या आंदोलनाबाबत या बैठकीत तोडगा काढला जाणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान आयएएस अधिकाऱ्यांना हाताशी धरुन भाजप, मोदी सरकार आमच्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप आम आदमी पक्षानं केला आहे. केजरीवाल यांच्या या आंदोलनाला समर्थन म्हणून पक्षानं याआधी उपराज्यपालांच्या निवासस्थानावर मोर्चाही काढला होता. मुख्य सचिव अंशु प्रकाश यांना केजरीवाल यांच्या घरी झालेल्या मीटिंगमध्ये आपच्या दोन आमदारांनी थप्पड लगावल्याचा आरोप आहे. या मारहाणीनंतर सर्व अधिकाऱ्यांनी मिळून केजरीवाल सरकारविरोधात असहकार्याचं कडक पाऊल उचललं आहे. हे अधिकारी मंत्र्यांना आता भेटत नाहीत. त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या रुटीन मीटिंगवरही अधिका-यांनी बहिष्कार टाकला होता.त्यामुळे या अधिका-यांनी आंदोलन मागे घ्यावे या मागणीसाठी मुख्यमंत्री केरीवाल यांच्यासह अन्य आपचे मंत्री नायब राज्यपालांच्या घरी आंदोलनाला बसेल होते. त्यानंतर आयएएस अधिका-यांनी बैठकीला येण्यास तयारी दर्शवल्यामुळे केजरीवाल यांनी अखेर आंदोलन मागे घेतलं आहे.

 

COMMENTS