भाजपला लोकसभेत 215 पेक्षा कमी जागा मिळतील –अरविंद केजरीवाल

भाजपला लोकसभेत 215 पेक्षा कमी जागा मिळतील –अरविंद केजरीवाल

दिल्ली – गुजरात विधानसभेत काही प्रमाणात फटका बसल्यानंतर नुकत्याच झालेल्या राजस्थान आणि पश्चिम बंगला पोटनिवडणुकीत भाजपला सपाटून मार खावा लागला. राजस्थानमध्ये तर भाजप खासदाराच्या निधनामुळे झालेल्या दोन लोकसभा आणि एका विधानसभा अशा तीन ठिकाणी पोटनिवडणूक झाली. या तीनही ठिकाणी भाजपचे खासदार आमदार निवडूण आले होते. यावेळी भाजपने तीनही जागा गमावल्या. त्यामुळे केंद्रातलं भाजप सरकार काहीसं बॅकफूटवर आहे. त्यामुळेच याचवर्षी वर्षाअखेर राजस्थान, मध्यप्रदेशातील निवडणुकांसोबत लोकसभेच्या मध्यावधी निवडणूक होण्याची शक्याता वर्तविली जात आहे.

आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 215 पेक्षा कमी जागा मिळतील असं भाकित केलं आहे. देशातील अनेक लोकांशी आपण भेटलो आणि आणि त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपण हे भाकित करत असल्याचंही केजरीवाल म्हणाले. देशात सध्या बेरोजगारी हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. रोजगाराच्या बाबतीत देशातील युवक चिंतीत आहे. मध्यमवर्गीय लोक भाजपवर नाराज आहेत. त्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकीत बसेल असं भाकितही केजरीवाल यांनी केलं आहे. तसं ट्विट त्यांनी केलं आहे.

https://twitter.com/ArvindKejriwal/status/960431433331499008

COMMENTS