केरळमध्ये काँग्रेसकडून तृतीयपंथी शाखेचे उद्घाटन, 34 तृतीयपंथीयांना पक्षाचे सदस्यत्व !

केरळमध्ये काँग्रेसकडून तृतीयपंथी शाखेचे उद्घाटन, 34 तृतीयपंथीयांना पक्षाचे सदस्यत्व !

केरळ – केरळ काँग्रेसने बुधवारी तिरुअनंतपुरम येथे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या उपस्थितीत तृतीयपंथी शाखेचे उद्घाटन केले आहे. यावेळी तृतीयपंथीयांना पक्षाचे पदाधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. 34 तृतीयपंथीयांना पक्षाचे सदस्यत्व देण्यात आले असून एकूणच राज्य समितीत 50 तृतीयपंथी सदस्य असल्याची माहिती केरळ काँग्रेसने दिली आहे. केरळमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारची शाखा स्थापन करण्यात आली असून राज्यातील तृतीयपंथीयांच्या हक्कासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी ही समिती काम करणार आहे.

COMMENTS