गिरीश महाजनांच्या चॅलेंजला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, “पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी…”

गिरीश महाजनांच्या चॅलेंजला एकनाथ खडसेंचं प्रत्युत्तर, “पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी…”

जळगाव – पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसे यांना पक्षातील नेत्यांनीच पाडलं, असा आरोप एकनाथ खडसे यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना, भाजपमधील पाडापाडी करणाऱ्या नेत्यांची नावं जाहीर कराच, असं खुलं चॅलेंज गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना दिलं होतं. त्यावर खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. पाडापाडी करणाऱ्या पक्षातील नेत्यांची नावानिशी यादी मी वरिष्ठांकडे जमा केली आहे. पक्षाध्यक्षांनी परवानगी दिली तर मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन ती सर्वांना सांगतो असं उत्तर खडसे यांनी दिलं आहे.

दरम्यान आज पक्षातील नाराज नेत्यांची मनधरणी करण्यासाठी जळगाव येथे भाजपची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि गिरीश महाजन यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांची समजूत घालण्यासाठी ही बैठक घेण्यात आली होती. परंतु खडसेंनीच बैठकीला येण्यास बराच उशीर केला. दुपारी साडेतीनच्या सुमारास ते कन्या रोहिणी खडसे आणि सून रक्षा खडसे यांच्यासह हजर झाले. यावेळी या नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.

COMMENTS