एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, शरद पवारांची घेणार भेट!

एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?, शरद पवारांची घेणार भेट!

मुंबई – भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे हे मोठा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.एकनाथ खडसे आज रात्री नागपुरात दाखल होणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही नागपुरात आहेत. त्यामुळे शरद पवार आणि एकनाथ खडसे यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे. यादरम्यान ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याबाबत निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. परळी येथील मेळाव्यात त्यांनी पंकजा मुंडे भाजप सोडणार नाहीत, पण माझा भरोसा नसल्याचं वक्तव्य केलं होतं. तेव्हापासून ते पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. तसेच खडसे यांनी दिल्लीत जाऊन शरद पवारांचीही भेट घेतली होती. दिल्लीतून परतल्यानंतर खडसेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर आज खडसे पुन्हा पवारांना भेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भेटीत ते राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे या भेटीकडे राज्याचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान शरद पवार आज नागपूरमध्ये दाखल झाले आहेत. ते विदर्भातील नेत्यांची बैठक घेणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांसोबत चर्चा करणार आहेत. त्यामुळे विदर्भात भाजपाला धक्का देण्याचा प्रयत्न तर पवार करत नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे.

COMMENTS