भाजपचा आमदार आता एकनाथ खडसेंच्या मार्गावर

भाजपचा आमदार आता एकनाथ खडसेंच्या मार्गावर

जळगाव : भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे यांच्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्र जाहिरात व बॅनरवरुन भाजप नेते गायब झाल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या बॅनरवर केवळ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांचा फोटो दिसत आहे. हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या बॅनरच्या निमित्ताने आपण एकनाथ खडसे यांच्या मार्गावर असल्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. परंतु एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार का असा प्रश्न निर्माण होत होती. काहींनी पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या बॅनरवर भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे व रोहिणी खडसे यांचा फोटो लावल्याचे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांनी दिलेल्या जाहिरातींमध्ये किंवा वृत्तपत्रातील जाहिरातीमध्ये कुठेही गिरीश महाजन किंवा भाजपच्या मोठ्या नेत्यांचे छायाचित्र दिसत नाही, त्यामुळे जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

COMMENTS