अमरावतीचे विजयी उमेदवार किरण सरनाईक काॅंग्रेसशी संबंधित

अमरावतीचे विजयी उमेदवार किरण सरनाईक काॅंग्रेसशी संबंधित

अमरावती –  विधान परिषदेच्या अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपचे उमेदवारांना चिटपट करून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक विजयी झाले. त्यांनी विद्यमान आमदार व महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव केला. सरनाईक घऱाणे हे मागील ५० वर्षांपासून काॅंग्रेसशी एकनिष्ट राहिले आहेत.

विधान परिषदेच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. दोन्ही प्रतिस्पर्धिनी एकमेकांना टक्कर दिली. किरण सरनाईक आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्यात मुख्य लढत आहे. दरम्यान, निकाल स्पष्ट होत असताना अचानक अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांनी बाजी मारली.  तर भाजपच्या नितीन धांडेंचा दारूण पराभव झाला. अमरावती शिक्षक मतदारसंघात किरण सरनाईकांनी आघाडी घेतल्यानं ही निवडणुकीची रंगत तिरंगी झाली आहे.

विजयी उमेदवार किरण सरनाईक हे काँग्रेसच्या माजी आमदार मालतीबाई सरनाईक यांचे ते पुत्र आहेत. विशेष म्हणजे मागील ५० वर्षांपासून सरनाईक घराणं हे काँग्रेस पक्षाच्या सोबत होतं. पेशानं वकील असून, त्यांचं शिक्षण बीएएलएलबीपर्यंत झालं आहे. तसेच ते अमरावती विभागीय शिक्षक संघाचे अध्यक्षही होते. अमरावती विभागातील संस्था चालक मंडळाचे ते विभागीय अध्यक्षही राहिले आहेत. वाशीममधल्या श्री शिवाजी संस्थेचंही अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्षही होते. विद्यार्थी संघाचे ते माजी अध्यक्षही राहिले आहेत.

COMMENTS