धनंजय मुंडेंच्या संकटात आणखी भर

मुंबई – राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात एका महिलेने बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी फेसबुकवर आपली बाजू मांडत असताना संबंधित महिलेच्या बहिणीशी त्यांचे संबंध असल्याचे मान्य केले. तिच्या नावे मालमत्ता खरेदी केली आहे. तसेच तिच्यापासून झालेल्या मुलांना आपण आपले नाव दिले असून त्यांचे पालनपोषणही आपणच करत असल्याचे मुंडे यांनी फेसबुकवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

या घटनेमुळे राज्यात खळबळ उडी असून मुंडेंचे राजकीय कारकिर्द धोक्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोणतेही भाष्य केले नाही. मात्र, भाजपकडून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. बलात्कार आणि लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप झालेले धनंजय मुंडे यांना भारतीय सर्व बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. यामध्ये असे म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांनी ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या दोन पत्नींची आणि सर्व मुलांची माहिती लपवली होती. तसेच त्यांच्या नावावर असलेल्या मालमत्तांची माहिती देखील त्यांनी लपवली होती, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने या प्रकरणाची चौकशी करुन योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे.

COMMENTS