सदोष सोयाबीन प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत किसान सभेची प्रतिक्रिया ! VIDEO

सदोष सोयाबीन प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत किसान सभेची प्रतिक्रिया ! VIDEO

मुंबई – सदोष सोयाबीन प्रश्नी मुख्यमंत्र्यांच्या घोषणेबाबत किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सदोष बियाण्यांबाबत सरकारने वेळ मारून नेणाऱ्या घोषणा करण्यापेक्षा कंपन्या व दोषींकडून नुकसान भरपाई वसूल करता येईल यासाठीची तरतूद असणारा अध्यादेश काढावा. तो पूर्वलक्षी पद्धतीने लागू करून यानुसार दोषी कंपन्यांकडून भरपाई वसूल करावी. आगामी काळात शेतकऱ्यांची अशी फसवणूक होणार नाही यासाठी या अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करावे. तसेच सरकाने स्वतःही जबाबदारी स्वीकारून आपल्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या नुकसानीची रास्त भरपाई द्यावी अशी मागणी डॉ.अजित नवले यांनी केली आहे.

COMMENTS