ग्रामपंचायत निवडणुकीवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

ग्रामपंचायत निवडणुकीवरून शिवसेना-भाजपमध्ये जुंपली

सिंधुदुर्ग – एकवर्षांपूर्वी शिवसेनेने भाजपपासून फारकत घेऊन काॅंग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार स्थान केल्यापासून शिवसेना विरुध्द भाजप हा संघर्ष होत आहे. हा विविध विषयांवर होत असतो. सध्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहे. त्यामध्ये बहुसंख्य ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. पण त्या कोणाच्या यामुद्दांवर शिवसेना-भाजपमध्ये जुंपली आहे.

भाजपच्यावतीने आशिष शेलार यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. कोकणात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आशिष शेलार यांनी ट्विट करून भाजपवर टिका केली. सिंधुदुर्गात 2 ग्रामपंचायती आणि 61 सदस्य तर रत्नागिरीत 121असे एकुण भाजपाचे 2 ग्रामपंचायतीसह 182 सदस्य बिनविरोध आले. अजून निवडणूक बाकी आहेच.. कोकण म्हणजे आम्हीच..अशा अहंकारी पक्षाचे “वस्त्रहरण” सुरु झाले रे महाराजा! आता मुंबई-ठाण्यात मालवणी खाजा भी आमचो अन् जलेबी-फापडा भी आपडो!

यावर उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी भाष्य करून आशिष शेलार यांनी केलेले वक्तव्य केवळ कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविणारा आहे. बिनविरोध निवडणुका झालेल्या बहुसंख्य ग्रामपंचायती महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या ताब्यात आहे. निवडणूकीनंतरही बहुसंख्य ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात असतील.

COMMENTS