भर सभागृहात भाजपच्या नगरसेवकानं घेतली काँग्रेसच्या नगरसेवकाची पप्पी!

भर सभागृहात भाजपच्या नगरसेवकानं घेतली काँग्रेसच्या नगरसेवकाची पप्पी!

कोल्हापूर – आपल्याला आपल्या पक्षात जेवढा मान दिला जात नाही तेवढा काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये दिला जातो. त्यामुळे मी खुश आहे असं म्हणत कोल्हापूर महापालिकेतील भाजपा नगरसेवक कमलाकार भोपळे यांनी काँग्रेस नगरसेवक शारंगधर देशमुख यांची पप्पी घेतली. कोल्हापूर महापालिकेत भाजपा विरोधी पक्षात आहे आणि कमलाकर भोपळे हे भाजपाचे नगरसेवक आहेत. त्यांनी सत्तारुढ पक्षातील शारंगधर देशमुख यांची पप्पी ङेतल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान महानगरपालिकेत आज विरोधी गट असलेल्या ताराराणी आघाडीचे नगरसेवक कमलाकर भोपळे सत्ताधारी गटाच्या बाकावर जाऊन बसले. त्यांच्या शेजारी काँग्रेसचे गटनेते आणि स्थायी समितीचे सभापती शारगंधर देशमुख बसले होते. सभागृहाचे कामकाज सुरु झाले आणि अभिनंदनाचे ठराव सुरु असतानाच, भोपळे आणि देशमुख यांच्यात काहीतरी बोलणे झाले. त्यानंतर खुशीत असलेल्या कमलाकर भोपळे यांनी भरसभागृहात शारगंधर देशमुख यांच्या गालाची पप्पी घेतली. हे दृश्य पाहून सर्वच अवाक झाले.

COMMENTS