कोल्हापूर – लोकसभेतील पराभवानंतर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीने जिंकल्या!

कोल्हापूर – लोकसभेतील पराभवानंतर महापालिका पोटनिवडणुकीत दोन्ही जागा आघाडीने जिंकल्या!

कोल्हापूर -काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षित जागा मिळवता आल्या नाहीत. परंतु या पराभवानंतरही महापालिका पोटनिवडणुकीत मात्र आघाडीची सरशी पहायला मिळत आहे. कारण कोल्हापूर महापालिकेतील सिध्दार्थनगर आणि पद्मराज याठिकाणी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत आघाडीनं यश मिळवलं आहे. सिध्दार्थनगर प्रभागात काँग्रेसचे जयकुमार पटकारे विजयी झाले आहेत. तर पद्मराज प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले आहे.

अजित राऊत

दरम्यान या दोन्ही प्रभागातील राषट्रवादीचे नगरसेवक अजिंक्य चव्हाण आणि अफजल फिरजादे यांची निवड रद्द झाल्याने याठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात आली होती. या दोघांवरही पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. परंतु महापालिकेतील सिध्दार्थनगर आणि पद्मराज याठिकाणी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीतही आघाडीनं यश मिळवलं आहे.

जय पटकारे ,प्रभाग क्रं 28 सिध्दार्थ नगर ,काँग्रेस

सिध्दार्थनगर प्रभागात काँग्रेसचे जयकुमार पटकारे विजयी झाले आहेत. तर पद्मराज प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित राऊत विजयी झाले आहे. त्यामुळे या विजयाचा आघाडीला विधानसभा निवडणुकीत फायदा होईल असं बोललं जात आहे.

COMMENTS