कोल्हापूर, नाशिक, हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा भाजपला धक्का!

कोल्हापूर, नाशिक, हिंगोली जिल्हा परिषदेत महाविकास आघाडीचा भाजपला धक्का!

मुंबई – कोल्हापूर, नाशिक, हिंगोली जिल्हा परिषदेसाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत भाजपला धक्का बसला असला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीत भाजपचा पराभव झाला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदी काँग्रेसचे बजरंग पाटील यांचा विजय झाला आहे. पाटील यांनी भाजपाचे उमेदवार अरुणकुमार इंगवले यांचा पराभव केला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग पाटील यांना 41 मते तर विरोधी उमेदवार अरुण इंगवले यांना 24 मते पडली आहेत.

तसेच कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांची निवड करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदाच्या निवडीतही भाजपाच्या सहकारी आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. राष्ट्रवादीचे सतीश पाटील यांना 41 तर राहुल आवाडे यांना 24 मतं मिळाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेवर अखेर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला असून
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेवर सत्ता अबाधित राखण्यात अपयश आलं आहे.

नाशिक जिल्हा परिषद

दरम्यान नाशिक जिल्हा परिषदेत शिवसेनेचे बाळासाहेब क्षीरसागर यांची अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीचे सयाजी गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडणुकीआधी भाजपनं माघार घेतल्यामुळे या दोन्ही नेत्यांची बिनविरोध निवड झाली आहे.

हिंगोली जिल्हा परिषद

हिंगोली जिल्हा परिषदेत शिवसेनेचे गणाची बेले यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर उपाध्यपदी राष्ट्रवादीचे मनिष आखरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. तियामुळे जिल्ह्यात पंचायत समित्यांबरोबर जिल्हा परिषदेतही महाविकास आघाडीचं वर्चशिव पहायला मिळत आहे.

COMMENTS