कोल्हापुरात राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांविरोधात बॅनरबाजी!

कोल्हापुरात राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांविरोधात बॅनरबाजी!

कोल्हापूर – महाजनादेश यात्रेनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीन रातोरात होर्डिंग्ज लावण्यात आले होते. शहरात विविध ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात महापूर, कडकनाथ; कांदा आयात, गडकोट किल्ले यांचा उल्लेख करत ही बॅनरबाजी करण्यात आली होती.

मुख्यमंत्री फडणवीस ज्या मार्गाने रॅली काढणार आहेत त्या मार्गावरील प्रमुख चौकात राष्ट्रवादीने ही होर्डिंग्ज उभारले होते.परंतु मध्यरात्री लावलेली ही होर्डिंग्ज आज सकाळी पोलिसांनी हटविली आहेत.

दरम्यान मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा ‘मी परत येतोय’ या घोषवाक्य घेऊन सुरू आहे. त्याला टोमणा मारत ‘मी पस्तावतोय’ असा उल्लेख या फलकावर करण्यात आला आहे. जागोजागी लावलेल्या या फलकामुळे कोल्हापूर शहरात एकच खळबळ उडाली. त्यामुळे कोल्हापुरात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असे पोस्टरयुद्ध पाहायला मिळत आहे.

COMMENTS