कोल्हापुरात पुन्हा राष्ट्रवादीचाच महापौर, भाजप-ताराराणी आघाडीचा पराभव !

कोल्हापुरात पुन्हा राष्ट्रवादीचाच महापौर, भाजप-ताराराणी आघाडीचा पराभव !

कोल्हापूर – कोल्हापुरात महापौरपदावरुन सुरू असलेल्या चर्चेला अखेर विराम मिळाला आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या सरिता मोरे या विजयी झाल्या आहेत. त्यांनी ताराराणी आघाडी आणि भाजपच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा पराभव केला आहे. सरिता मोरे यांना तब्बल 41 मते मिळाली. तर ताराराणी आघाडी आणि भाजपच्या जयश्री जाधव यांना केवळ 33 मते मिळाली. मतदानावेळी शिवसेनेचे 4 नगरसेवक अनुपस्थित राहिले.

              महापौरपदाच्या निवडणुकीच्या तोंडावर पाच नगरसवेकांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं. त्यामध्ये आघाडीचे 4 तर भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश होता. त्यामुळे महापौरपदासाठी काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप ताराराणी आघाडी यांच्यात चुरस निर्माण झाली होती. मात्र अखेर आघाडीने योग्य नियोजन करुन महापौरपद राखण्यात यश मिळवलं.

COMMENTS