कोल्हापूर- भररस्त्यात हवेत गोळीबार करणा-या सरपंचावर गुन्हा दाखल ! VIDEO

कोल्हापूर- भररस्त्यात हवेत गोळीबार करणा-या सरपंचावर गुन्हा दाखल ! VIDEO

कोल्हापूर – शिरोलीचे लोकनियुक्त सरपंच शशिकांत खवरे यांनी भररस्त्यात हवेत गोळीबार केला आहे. लक्ष्मी पुजनाला उत्साहाच्या भरात त्यांनी हवेत गोळ्या झाडल्या आहेत. डबलबारी बंदुक आणि पिस्तुलमधून त्यांनी गोळीबार केला होता भररस्त्यात हे कृत्य केल्याने  परिसरात दहशतीचं वातावरण आहे. तर गोळीबार करणारे  सरपंच शशिकांत खवरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोली एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांनी शस्त्र हाताळण्याच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.

COMMENTS