चमकोगिरी आणि टपोरीगिरी करण्यात धनंजय मुंडे वस्ताद – जयदत्त क्षीरसागर

चमकोगिरी आणि टपोरीगिरी करण्यात धनंजय मुंडे वस्ताद – जयदत्त क्षीरसागर

मुंबई – शिवसेनेचे मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.धनंजय मुंडे हे फक्त चमकोगिरी आणि टपोरीगिरी करण्यात वस्ताद असल्याची बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच राज्यांत काँग्रेस-राष्ट्रवादी हुडकून सापडणार नाही. बीड मतदारसंघातच नाही तर राज्यांत असच चित्र असल्याचंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची गळती सुरूच आहे त्याच्या पक्षात फार कुणी राहणार नाही असा टोलाही त्यांनी लगावला. राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी औषधालाही शिल्लक राहणार नाही अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली आहे.

दरम्यान.राज्यात प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम हेच आघाडीवर असून त्यांच्याशीच भाजप-शिवसेनेची खरी लढत आहे असंही क्षारसागर यांनी म्हटलं आहे. तस्च बीड विधानसभा मतदारसंघात अनेक विकास कामे केली आहेत, सूतगिरणी, शिक्षण संस्था दूध संघ, बाजार समिती आणि नगर पालिकेच्या माध्यमातून लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मदत केली. येत्या पुढच्या कालवधीत बीडचा दुष्काळ हा भूतकाळ करण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचंही क्षीरसागर यांनी म्हटलं आहे.

COMMENTS