कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आज करणार बहूमत सिद्ध !

कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी आज करणार बहूमत सिद्ध !

बंगळुरु  कर्नाटकचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री कुमारस्वामी हे आज बहूमत सिद्ध करणार आहेत. आज दुपारी तीन वाजता बहूमत चाचणी होणार असून यावेळी ते बहूमत सिद्ध करणार आहेत.  दोन दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांनी शपथ घेतली. त्यांना 15 दिवसात बहुमत सिद्ध करा, असं राज्यपाल वाजूभाई वाला यांनी सांगितलं होतं. परंतु कुमारस्वामी यांनी दोनच दिवसात बहुमत सिद्ध करण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेसचे 78 आणि जेडीएसचे 38 असे 116 तसंच एका अपक्षासह 117 आमदार असल्याचा दावा काँग्रेस-जेडीएस आघाडीने केला असून आज दुपारी ते बहूमत सिद्ध करणार आहेत.

दरम्यान बहूमत सिद्ध न करता आल्यामुळे भाजपचे येडियुरप्पा यांना 55 तासात म्हणजेच अडीच दिवसात मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. सुप्रीम कोर्टाने भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 19 मे रोजी दुपारची मुदत दिली होती. भाजपला बहुमताचा 112 हा आकडा गाठणं अशक्य होतं. पण तरीही आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावा भाजप आणि येडियुरप्पांकडून करण्यात येत होता. पण त्यांना ते शक्य झालं नसल्यामुळे शेवटी कर्नाटकात भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही.

कर्नाटक निवडणूक निकाल 

भाजप 104

काँग्रेस 78

जनता दल (सेक्युलर) 37

बहुजन समाज पार्टी 1

कर्नाटक प्रज्ञावंत जनता पार्टी 1

अपक्ष 1

 

COMMENTS