लातूरमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसचा महापौर विजयी!

लातूरमध्ये भाजपला धक्का, काँग्रेसचा महापौर विजयी!

लातूर – लातूर महापालिकेत भाजपला धक्का बसला असून महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे विक्रांत गोजमगुंडे हे निवडून आले आहेत. हात उंचावून झालेल्या मतदानात काँग्रेसच्या विक्रांत गोजमगुंडे यांना 35 तर भाजपच्या शैलेश गोजमगुंडे यांना 33 मते मिळाली. यावेळी भाजपचे नगरसेवक फुटल्याने काँग्रेसच्या पारड्यात जास्त मते पडली.
भाजपचे नगरसेवक चंद्रकांत बिराजदार आणि नगरसेविका गीता गौड यांनी काँग्रेसला मतदान केलं. त्यामुळे भाजपसाठी हा मोठ्ठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान लातूर महापालिकेत एकूण 70 नगरसेवक असून भाजपचे 36 नगरसेवक होते. मात्र, एका नगरसवेकाचे निधन झाल्याने भाजपची संख्या 35 वर आली होती. तर काँग्रेसचे 33 नगरसवेक तर राष्ट्रवादीचे 2 नगसेवक असे संख्याबळ होते. मात्र, भाजपचे दोन नगरसवेक फुटल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे.

COMMENTS