ब्रेकिंग न्यूज – लातूरमध्ये दोन्ही देशमुख बंधू आघाडीवर!

ब्रेकिंग न्यूज – लातूरमध्ये दोन्ही देशमुख बंधू आघाडीवर!

लातूर – विधानसभा निवडणुकीच्या 288 जागांसाठी आज मतमोजणी सुरु आहे. या मतमोजणीनंतर निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु मतमोजणीदरम्यान काही दिग्गज नेते आघाडीवर आहेत. तर काही पिछाडीवर आहेत. पिछाडीवरील नेते मागेच राहिले तर त्यांची हार होऊ शकते. महाराष्ट्रात 288 जागांपैकी काही महत्त्वाच्या ठिकाणी दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परळी, बारामती, सातारा, वरळी, शिर्डी, येवला, लातूर, भोकर, या महत्त्वाच्या मतदारसंघामध्ये दिग्गज नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे या मतदारसंघातील निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

लातूर शहर आणि ग्रामीण मतदारसंघात काँग्रेसचे दोन्ही उमेदवार आघाडीवर आहेत. याठिकाणी दिवंगत विलासराव देशमुख यांचे पूत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे मैदानात आहेत. अमित देशमुख हे लातूर शहर मतदारसंघातून तर धीरज देशमुख हे लातूर ग्रामीण मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. हे दोन्ही बंधू सध्या आघाडीवर आहेत.

COMMENTS