… तर लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेंना भाजप दाखवणार कात्रजचा घाट !

… तर लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगेंना भाजप दाखवणार कात्रजचा घाट !

चिंचवड – अटल संकल्प यात्रेनं काल भाजपनं लोकसभा निवढणुकीचे रणशिंग फुंकले. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी या मेळाव्यात जोरादरा बँटिंग केली. मावळ खो-यातून शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात केली म्हणून या ठिकाणाहून भाजपच्या प्रचाराची सुरुवात केली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मात्र दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे खासदार असलेल्या ठिकाणी प्रचार सभा घेणे हा एक प्रकार शिवेसनेला इशाराच होता.

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातही शिवसेनेला इशारा दिला. या दोन्ही मतदारसंघातून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणारे खासदारच निवडूण दिले जातील. तसं झालं नाही तर आमचे शिलेदार तयार आहेत असंही त्यांनी सांगितलं. एकप्रकारे तुम्ही आमच्यासोबत आलात तर तुमच्यासह आणि आमच्यासोबत आला नाहीत तर तुमच्याशिवाय असाच इशारा शिवसेनेला दिला. मात्र त्याच वेळी या वाक्याचा अर्थ असाही होतो की जर युती झाली तर दोन्ही मतदारसंघ हे शिवसेनला सोडले जातील.

मुख्यमंत्र्यांच्या आधी पिंपरी चिंचवडमधील भाजपचे दोन शिलेदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांची भाषणे झाली. दोघांनीही शिरुर आणि मावळ हे मतदारसंघ आपल्यासाठी सोडवून घ्या अशी मागणी केली. म्हणज्येच शिवसेनेसोबत युती झाली तर दोन्ही मतदारसंघ भाजपकडे सोडवून घ्या अशी मागणी केली. महेश लांडगे हे शिरुरमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर लक्ष्मण जगताप हे मावळ मतदारसंघातून लढण्यास इच्छुक आहेत. मुख्यमंत्र्यांनी मात्र युती झाली तर दोन्ही मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याचे संकेत दिले आहेत. थोडक्यात काय तर शिवसेनेसोबत युती झाली दोन्ही इच्छुकांना भाजप कात्रजचा घाट दाखवणार असंच महणावं लागेल.

COMMENTS