…तर शिवसेनेने निवडणुकीनंतर आम्हाला जबाबदार धरू नये, भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचा इशारा !

…तर शिवसेनेने निवडणुकीनंतर आम्हाला जबाबदार धरू नये, भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचा इशारा !

पुणे – आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी शिवसेनेला इशारा दिला आहे. जे बुथप्रमुखांना देखील नेमू शकत नाहीत अशांना जर लोकसभेत शिवसेनेनं उमेदवारी दिली आणि यामध्ये पराभव झाला तर निवडणुकीनंतर आम्हाला जबाबदार धरू नये असा इशारा जगताप यांनी दिला आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपने मावळ लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार आणि जिंकूनही येणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं आहे.

दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी गेली काही महिन्यांपासून लक्ष्मण जगताप यांनी तयारी सुरु केली आहे. या मतदारसंघात त्यांची जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे. परंतु या निवडणुकीत शिवसेना-भाजपची युती झाली तर ही जागा कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागलं आहे. शिवसेना-भाजपची युती झाली नाही तर या मतदारसंघात भाजपनं आपल्याला संधी देईल आणि संधी मिळालीच तर मीच निवडून येणार असल्याचा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला आहे.

COMMENTS