भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवारांची भेट,  निवडणुकीत देणार पाठिंबा?

भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि पार्थ पवारांची भेट, निवडणुकीत देणार पाठिंबा?

पिंपरी -चिंचवड – आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मावळमधील लोकसभेचे उमेदवार पार्थ पवार यांची भेट झाली. या दोन्ही नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. पार्थ पवार आणि लक्ष्मण जगताप हे आज शिवजयंतीच्या कार्यक्रमात एकत्रित आले होते. त्यावेळी पार्थ पवार आणि जगताप यांनी हातात हात देऊन एकमेकांचं स्वागत केलं असल्याचं पहावयास मिळालं आहे.

दरम्यान आमदार लक्ष्मण जगताप हे लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. तसेच ते मावळमधील शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. परंतु शिवसेना-भाजपची युती झाल्यामुळे ही जागा शिवसेनेला गेली आहे. त्यामुळे लक्ष्मण जगताप हे नाराज आहेत. अशातच आज राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांची त्यांनी भेट घेतल्यामुळे जगताप हे श्रीरंग बारणे यांना मदत करण्यापेक्षा पार्थ पवारांनाच पाठींबा देतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

COMMENTS