विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची निवड !

विधान परिषदेच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या ‘या’ नेत्याची निवड !

मुंबई – विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांची निवड केल्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापतीपदाचीही आज निवड करण्यात आली आहे. शिवसेनेच्या आमदार नीलम गोऱ्हे यांची या पदावर निवड करण्यात आली आहे. जोगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे हे १७ जुलै २०१८पर्यंत विधान परिषदेचे उपसभापती होते. त्यांचा कार्यकाळ संपल्यापासून हे पद रिक्त आहे. संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसनं या पदावर दावा केला होता.

दरम्यान गोह्रे या २००२ पासून विधान परिषदेच्या त्या सदस्या आहेत. याशिवाय विविध विषय समित्यांवर देखील त्यांनी काम केलं असुन विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादीचे १७, काँग्रेसचे १६, भाजपचे २३ , शिवसेनेचे १२, लोकभारती ,शेकाप, पीपल्स रिपब्लिकन पार्टी आणि राष्ट्रीय समाज पक्षचा प्रत्येकी १ आमदार आहे तर, ६ अपक्ष आमदार आहेत.

COMMENTS