‘या’ सहा ज्येष्ठ आमदारांपैकी एक जण होणार विधानसभेचा हंगामी अध्यक्ष !

‘या’ सहा ज्येष्ठ आमदारांपैकी एक जण होणार विधानसभेचा हंगामी अध्यक्ष !

मुंबई – विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी निवड करण्यासाठी विधिमंडळातून सहा ज्येष्ठ आमदारांची यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. विधीमंडळातून पाठवलेल्या यादीतील नावांपैकी एकाची विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी राज्यपाल निवड करणार आहेत. त्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील, कालिदास कोळंबकर, बबनराव पाचपुते,बाळासाहेब थोरात, के सी पाडवी, दिलीप वळसे पाटील यांची नावे आहेत.

दरम्यान कालिदास कोळंबकर यांच्या नावावर हंगामी अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. कारण कोळंबकर हे ज्येष्ठ आमदार आहेत. वडाळा मतदारसंघातून ते सलग सात वेळा निवडून आले होते. कट्टर शिवसैनिक अशी त्यांची आधी ओळख होती. त्यानंतर ते नारायण राणेंसोबत काँग्रेसमध्ये गेले. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षांपासून त्यांची फडणवीस यांच्याशी जवळीक वाढली होती. त्यामुळे विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी भाजपने त्यांचं नाव पुढे केलं असल्याची माहिती आहे.

COMMENTS