दहावीच्या अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान !

दहावीच्या अभ्यासक्रमात भाजप आणि शिवसेनेचे गुणगान !

मुंबई – यावर्षीपासून दहावीच्या अभ्यासक्रमात राज्यशास्त्र हा विषय समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु हा विषय सध्या वादाच्या भोव-यात सापडणार असल्याचं दिसत आहे. कारण यामध्ये भाजप, शिवसेनेचे गुणगान करण्यात आले आहेत. तर अप्रत्यक्षपणे काँग्रेस तसेच कम्युनिस्ट पार्टीवर जोरदार निशाणा साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ‘भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय राजकारणातील महत्त्वाचा पक्ष असून प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर पक्षाचा भर आहे,’ असा उल्लेख करण्यात आला आहे. तर शिवसेना हा राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांची जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतीयांना विरोध करण्यासाठी झाली आहे. तसेच धनुष्यबाण या शिवसेनेच्या चिन्हासह भगव्या रंगात छापण्यात आली आहे.

बालभारतीने तयार केलेल्या नव्या पाठ्यपुस्तकांमध्ये म्युच्युअल फंड्स, शेअर बाजार, जीएसटी त्याचबरोबर अवयवदान अशा ताज्या गोष्टींची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वाती महाडिक यांच्यासारख्या वीरांगनेचीही माहिती देण्यात आली आहे. दरम्यान भाजप-शिवसेनेचे गुणगान करण्यात आल्यामुळे काँग्रेसने सरकारवर जोरदार टीका केली आहे.

 

 

COMMENTS