Live Updete : शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; दुध, भाजीपाल्याचे दर कडाडले

Live Updete : शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस; दुध, भाजीपाल्याचे दर कडाडले

राज्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाचा आजचा दुसरा दिवस आहे. काल अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकून आंदोलन केले. त्यामुळं आता दुधाची आणि भाज्यांची टंचाई जाणवत आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत. तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिल्यानंतर आता सामान्य नागरिकांनाही याचा फटका बसणार आहे.

पूर्वी नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये रोज दिवसाला ५०० गाड्या भरून फळभाज्या येत होत्या. मात्र आता 180 गाड्या आल्या आहे. ठाणे आणि कल्याणमध्ये तर यापेक्षा बिकट अवस्था आहे. आज सकाळपासून एकही फळभाज्यांची गाडी याठिकाणी आली नाही. तर दादरमध्ये ही पहिले 200 गाडया भरून भाजीपाला येत होता. मात्र आता या गाड्यांची संख्या घटून 50 ते 60 वर आली आहे.

Live Updete

# येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल टोल नाक्यावरील हिंसक आंदोलनात असलेल्या 40 जणांना पोलिसांनी रात्री अटक केली.

# नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती कांदा – बटाटा मार्केट मद्ये बटाटा च्या 44 गाड्या आवक तर कांद्याची एकही गाडी दाखल नाही

# नांदेड –  बाजार उठवन्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याना पोलिसांनी घेतले ताब्यात. स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.  नांदेड शहरातील तरोडा नाका येथील घटना.

# तर माहुर तालुक्यातील धानोडा फाटा येथे शिवामृतची गाडी अडवून दूध पॉकेट रस्त्यावर फेकले

# धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत फक्त 10% भाजीपाल्याची आवक….

# बहुतांश भाजीपाला बाजारात सुकशूकाट….

# दुधाच्या पुरवठ्यावर ही प्रतिकूल परिणाम ….

# 30 ते 40 टक्के दुधाचा पुरवठा कमी….

# येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे केले दहन

# पिंपळगाव  जलाल टोल नाक्यावरील घटनेचा केला निषेध

# मनमाडला बाजार समिती  संपाच्या दुसऱ्या दिवशीही  शुकशुकाट..

# भाजीपाला न मिळाल्याने  व्यापारी रिकाम्या  हाताने  परत… आज  बाजारात   भाज्यांची चणचण …

 

मनमाड – संतप्त शेतकऱ्यांनी मनमाडला पुणे-इंदौर महार्गावर रास्ता रोको करून दूध ओतले रस्त्यावर यावेळी शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली

 

नाशिक – संपुर्ण कर्जमाफीसाठी येवला तालुक्यातील धुळगाव येथे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करीत भाजप सरकारचा निषेध केला . शेतकऱ्यांचा शेतमालाला हमीभाव द्यावा व कर्जमाफीचा निर्णय तात्काळ घ्यावा अशी मागणी या वेळी करण्यात आली . कांदा उत्पादकाना त्वरीत न्याय देत कांदा दरांसाठी तातडीने पाऊले उचलण्याची मागणी केली .पिंपळगाव  जलाल टोल नाक्यावरील शेतकऱ्यांवरील अमानुष लाठीमारांच्या घटनेचा निषेध यावेळी करण्यात आला. सटाणा तालुक्यातील जायखेड़ा येथून गजरात मध्ये कांदा ट्रक मध्ये भरून जात असताना शेतकरी तरुणांनी हां ट्रक अडवत त्यातील कांद्याच्या गोन्या रस्त्यावर आतून दिल्या.

 

उस्मानाबाद – शहरातुन जाणारा राष्ट्रीय महामार्ग शेतकऱ्यांनी अडवला.

सोलापूर- औरंगाबाद रस्त्यावर रस्ता रोको सुरू असल्या मुळे दोन्ही बाजूने 2 किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या. कर्ज माफी आणि शेतीमालाच्या हमी भावासाठी  शेतकरी आक्रमक

नंदुरबार – बऱ्हाणपूर अंकलेशवर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रस्ता रोको आंदोलन… महामार्गावरील वाहतूक ठप्प..गुजरात राज्यात जाणाऱ्या शेतीमालाच्या गाड्या रोखल्यात

हिंगोली –   हिंगोली जिल्ह्यातून ही उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून आज सकाळी हिंगोली नागपूर राज्य महामार्गावर शेतकऱ्यांनी एक तास भर रास्ता रोको केला, या संपात शेतकर्याबरोबर शेतमजूर कष्टकरी ही सहभागी झाल्याचं बघायला मिळाल. मुख्य रस्त्यावर आपली जनावर बांधून एक आगळा वेगळा रास्ता रोको येथे करण्यात आल्याचं बघायला मिळालं. यावेळी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्याच बघायला मिळाल, लग्न समारंभसाठी निघालेल्या वर्हाडाच्या वाहनांना ही एक तास भर थांबून ठेवण्यात आल होत. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच निवेदन मंडळ अधिकारी पतंगे यांना दिल्या नंतर येथील मार्ग खुला करण्यात आला. या निवेदनात शेतकऱ्यांच्या प्रलंबित विविध मागण्या  करण्यात आल्या आहेत..

बारामती –  बारामतीत पत्रकारांच्या पुढाकाराने शेतकरी प्रबोधन सभा.. कोणतीही राजकीय पार्श्वभुमी नसलेल्या आंदोलनात पत्रकारांचा सक्रिय सहभाग.. कर्जमाफी होइपर्यंत वीजबिल न भरण्याचा प्रबोधन सभेत निर्णय.. बारामती तालुक्यातील ग्रामपंचायती सरकारला पाठवणार ठराव..

बारामती तालुका दूध संघ दूध स्वीकारणार नाही. दूध संकलन बंद करण्याच्या दिल्या सुचना.. शेतकरी संपामुळे  बारामती तालुका दूध संघाचा निर्णय.. अध्यक्ष सतीश तावरे यांनी दिली माहिती.

सटाणा – शेतकरी संपात नामपूर येथे आज कडकडीत बंद.

इंदापूर – पुण्याकडे मिरची नेणारा टेम्पो अडवल्याप्रकरणी 15 ते 20 जणांवर गुन्हा दाखल.. वरकुटे बुद्रुक येथे टेम्पो अडवून मिरची पोत्यांचे नुकसान केल्याने गुन्हा दाखल.. इंदापूर पोलिस ठाण्यात रात्री उशीरा झाला गुन्हा दाखल..

अहमदनगर  – राहता तालुक्यातील खंडोबाच्या वाकड़ी गावात शेतकऱ्यांनी संप जोरदार सुरु ठेवला आहे. आज सकाळी 8 ते 10 गावातील शिवाजी चौकात शेकडो शेतकऱ्यांनी भजन गायन करुन संपात सहभागी होत आगळ्या वेगळ्या धार्मिक पद्धतीने राज्य शाशनचा निषेध सुरु ठेवला आहे.

हिंगोली –  नांदेड राज्य महामार्गावर रास्ता रोको… हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येते रस्ता अडवला..दूध सांडून भाज्या फेकून सरकारचा केला निषेध…शेकडो शेतकऱ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद

सोलापूर – सांगोल्यात शेतकरी  आक्रमक,  5000 लीटर दूध रस्त्यावर …

बारामती –  बारामती इंदापूर ॲग्रो डिलर्स असोसिएशनचा शेतकरी संपास पाठिंबा.. शनिवारी दुकाने बंद ठेवून घेणार संपात सहभाग.. असोसिएशनचे अध्यक्ष वैभव शहा यांनी दिली माहिती..

माळशिरस मधील आजचा आठवडा बाजार संप, शेतकरयांनी बंद पाडला, तर दुध डेअरीवर जाणारया दुधाच्या गाडयातील दुध गाडया अडवुन रस्त्यावर ओतण्यात आले.

उस्मानाबाद- भूममध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून बस वर दगडफेक

उमरगा – लातूर गुलबर्गा मार्गावर नारंगवाडी पाटी येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन, आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी

सातारा – कोरेगाव शहरात शेतकर्यांचे आंदोलन – आमदार शशिकांत शिंदे याना कोरेगाव पोलिसानी घेतले ताब्यात – कोरेगाव शहर बंद – पोलिस -शेतकरी यांच्यात बाचाबाची

शिर्डी-  कोपरगाव-येवला रस्त्यावर खिर्डी गणेश टोल नाक्‍याजवळ शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना काल (दि.1) नाटेगाव येथील शेतकरी अशोक शंकर मोरे (वय 45) यांचा अचानक मृत्यू झाला. आज किसान क्रांती समन्वय समीतीचे पदाधिका-यांनी अशोक मोरे यांच्या घरी कुंटूबीयांचे भेटुन सांत्वन केले.

बारामती –  बाबुर्डीतील शेतकऱ्यांचं बारामती-पुणे रस्त्यावर आंदोलन.. रास्ता रोको करत रस्त्यावर दूध ओतून दिला शेतकरी संपास पाठिंबा.. कर्जमाफीसाठी शेतकरी आक्रमक..

अमरावती – जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेत शेतकरी संपाचा उद्रेक :शेतकऱ्यांनी ठोकले बाजार समितीला टाळे.. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावरील आंदोलनामध्ये शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी येवल्यात सर्वपक्षांच्या वतीने करण्यात आला रास्ता रोको, गुन्हे मागे न घेतल्यास सोमवारी सर्वपक्षाच्या वतीने गाव बंद व रास्तारोको आंदोलनाचा इशारा

धुळे-  धुळे जिल्हा शिवसेना व शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घंटानाद आंदोलन.

संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी प्रवेशद्वाराबाहेर फेकले कांदे. शिवसेना कारकर्त्यासह शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी.  हमीभावासह संपूर्ण कर्जमाफी देण्याची केली मागणी.

वर्धा – शेतकऱ्यांचा अमरावती – नागपूर महामार्गावरील तळेगाव येथे रस्ता रोको ; भेंडी रस्त्यावर फेकून केला सरकारच्या धोरणाचा निषेध ; एक तासापासून वाहतूक ठप्प …. बाजार समितीत तूर खरेदी बंद केल्याचा निषेध; वर्धेच्या बजाज चौकात शेतकऱ्याचा चक्का जाम

सांगली – शेतकरी संपाला नांद्रे गाव चा पाठिंबा,  नांद्रे गाव बंद, सर्व व्यवहार ठप्प. नांद्रे गावातील शेतकऱ्यांनी शेती माल रोकला,गाडीतून घेवून जात असलेल्या  नारळ, फुले आणि गुळ रस्त्या वर टाकला.  नांद्रे गावच्या रस्त्या वरुण जाणाऱ्या वाहनांची शेतकरी करत आहेत तपासणी.

शिर्डी – शेती मालाला योग्य भाव मिळावा या आंदोलनाला माझा पाठिंबा आहे…..शेतकऱ्याच्या शेतीमालाला खर्चा वर आधारित योग्य भाव मिळावा याच्याशी मी सहमत आहे… कर्ज माफी साठी आपल्याला प्राधिर्ग असा लढा उभा करावा लागेल…. राजकारणी लोकांनी या आंदोलनाचा दुरुपयोग करू नये अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करावे हिंसा घडू नये….आज संगमनेर तालुक्यातील निमगाव पागा येथे आज अण्णा हजारे बोलत होते.

 

COMMENTS