कैराना, नागालँड लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दणका !

कैराना, नागालँड लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला दणका !

मुंबई – देशभरात घेण्यात आलेल्या लोकसभा आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे. कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला जोरदार धक्का बसला आहे.  

कैराना लोकसभा निवडणूक

या निवडणुकीत राष्ट्रीय लोक दलच्या तबस्सूम हसन विजयी झाल्या आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनामुळे येथील जागा रिक्त झाली होती. भाजपाने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली होती. हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपाला आव्हान दिले होते.

नागालँड लोकसभा निवडणूक

नागालँडमध्येही भाजपला जोरदार धक्का बसला असून या पोटनिवडणकीत एनपीएफचा उमेदवार विजयी झाला आहे. नागालँडच्या एकमेव लोकसभा मतदारसंघात नॅशनलिस्ट डेमोक्रॅटीक प्रोग्रेसिव पार्टीचे उमेदवार टोकेहो विजयी झाले आहेत.

विधानसभा पोटनिवडणूक

देशभरातील विधानसभेच्या दहा जागांवर घेण्यात आलेल्या निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीमध्ये भाजपला जोरदार धक्का बसला असल्याचं दिसून येत आहे. कारण उत्तराखंडमधील थराली मतदारसंघ वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपला अपयश आलं आहे.  झारखंडमधील दोन्ही जागांवर झारखंड मुक्ती मोर्चाच्या उमदेवारांनी बाजी मारली आहे. गोमीया मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बबीता देवी यांचा विजय झाला आहे. तर दुस-या जागेवर सिल्ली मतदारसंघात जेएमएमच्याच सीमा देवी यांचा विजय झाला आहे. त्यामुळे याठिकाणीही भाजपला धक्का बसला आहे.  बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंडमधील निकाल हाती आला असून बिहारमध्ये आरजेडीचा विजय झाला आहे. तर उत्तर प्रदेशात सपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. उत्तर प्रदेशात नूरपूरमध्ये सपाचे नईम उल हसन यांचा 6211 मतांनी विजय झाला आहे. तर बिहारमध्ये आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांनी जनतेला धन्यवाद दिले असून भाजप आणि नितीश कुमार यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे. बिहारमधील जनात लालूजींच्या सोबत असल्याचं तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे. तर मेघालयात काँग्रेसच्या उमेदवाराचा विजय झाला असल्याची माहिती आहे. तसेच पश्चिम बंगालमधील माहेशतलामधून टीएमसीच्या उमेदवार चंद्रा दास विजयी झाले आहेत.

देशभरातील विधानसभा पोटनिवडणुकीचे निकाल

उत्तर प्रदेश – नुरपूरमधून समाजवादी पक्षाचे उमेदवार नईमूल हसन विजयी

मेघालय – अंपती येथून काँग्रेसचे उमेदवार मियानी डी. शीरा विजयी
केरळ – चेंगन्नूरमधून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार विजयी
पंजाब – शाहकोटमधून काँग्रेसचे हरदेव सिंह यांचा ३८ हजार मतांनी विजय
कर्नाटक – राज राजेश्वरी नगरमधून काँग्रेस उमेदवार मुनिरत्ना ४१ हजार मतांनी विजयी
झारखंड – सिल्लीव गोमियामधून जेएमएमच्या उमेदवार सीमा देवी विजयी

झारखंड – गोमीया मतदारसंघात झारखंड मुक्ती मोर्चाच्या बबीता देवी यांचा विजय झाला आहे.
बिहार – जोकीहाटमधून राजदच्या उमेदवाराचा विजय
उत्तराखंड – थरालीमधून भाजपच्या उमेदवार मुन्नी देवी यांचा विजय
प. बंगाल – माहेशतलामधून टीएमसीच्या उमेदवार चंद्रा दास विजयी
महाराष्ट्र – पलुस-कडेगावमधून काँग्रेसचा उमेदवार बिनविरोध

COMMENTS