‘हे’ आहेत महाराष्ट्रातील भाजपचे स्टार प्रचारक, 41 जणांची यादी जाहीर!

‘हे’ आहेत महाराष्ट्रातील भाजपचे स्टार प्रचारक, 41 जणांची यादी जाहीर!

मुंबई – राज्यात निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने 41 स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. मोठ्या सभेपासून ते छोट्या सभागृहातील सभा असं भाजपाच्या प्रचाराचे सूत्र असणार  आहे, या सभांमध्ये हे 41 प्रचारक   प्रामुख्याने सभा घेणार आहेत.  24 मार्चला रविवारी कोल्हापुरात युतीच्या सभेचा शुभारंभ झाल्यानंतर राज्यभरात प्रचाराचा धडाका  सुरू होणार आहे.

स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी, अमित शाह, लालकृष्ण अडवाणी, राजनाथ सिंह, देवेंद्र फडणवीस, योगी आदित्यनाथ, सुषमा स्वराज, शिवराज सिंह, मुख्तार अब्बास नक्वी, मुरली मनोहर जोशी, नितीन गडकरी, पियुष गोयल यांच्यापासून ते माधव भंडारी, राम शिंदे, गिरीश महाजन अशा 41 प्रमुख नेत्यांचा समावेश असणार आहे.प्रत्येक लोकसभा निवडणुकीतील  स्थानिक राजकारण, जातीय समीकरणं, विरोधी पक्षांचे उमेदवार अशा विविध गोष्टी लक्षात घेऊन ही प्रचारकांची फौज मैदानात उतरवली जाणार आहे.

COMMENTS