4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या, भाजपची परिक्षा !

4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी उद्या, भाजपची परिक्षा !

दिल्ली – लोकसभेच्या चार जांगावरील पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या होत आहे. या चारही जागा यापूर्वी भाजपकडे होत्या. त्यामुळे त्या सर्व जागा राखण्याचं मोठं आव्हान भाजपपुढे आहे. महाराष्ट्रातील भंडारा गोंदिया आणि पालघर, उत्तर प्रदेशातील कैराना आणि नागालँडमधील एक जागेचा या मध्ये समावेश आहे. गेल्या चार वर्षात झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये भाजपचा मोठा पराभव झाला आहे. त्यामुळे 2014 मध्ये भाजपकडे असलेल्या 282 खासदारांची संख्या 272 वर आली आहे.

भंडारा गोंदियामध्ये तत्कालीन भाजप खासदार नाना पटोले यांनी भाजप आणि केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करत खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे भंडारा गोंदियामध्ये पोटनिवडणूक लागली आहे. पालघरमध्ये भाजपचे खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे ही निवडणूक लागली आहे. उत्तर प्रदेशातील कैरानामध्येही भाजपच्या उमेदवाराच्या निधनामुळे पोटनिवडणुक लागली आहे. तर नागालँडमध्ये खासदार नॅपू रॉय मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला होता. या चारही जागा भाजपच्या ताब्यात असल्यामुळे त्यांन त्या राख्याचं मोठं आव्हान पक्षासमोर आहे.

भंडारा गोंदियामध्ये नाना पटोले यांनी राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे आणि भाजपचे हेमंत पटेल यांच्यात सामना होतोत. या ठिकाणी भारिप बहुजन महासंघाचाही उमेदवार रिंगणात आहे. तर या ठिकाणी शिवसेनेनं उमेदवार उभा केला नाही. तसंच या ठिकाणी कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही. तर पालघरमध्ये शिवसेनेनं भाजपच्या विरोधात उमेदवार  उभा केला आहे. काँग्रेस आणि बहुजन विकास आघाडी अशी बहुरंगी लढत पालघरमध्ये होत आहे. दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचा मुलगा श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेत घेऊन शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे.

तिकडे कैरानामध्ये भाजपचे खासदार हुकुमसिंग यांच्या निधनामुळे पोटनिवडणुक होत आहे. भाजपनं हुकुमसिंग यांच्या मुलीला तिकीटं दिलं आहे. तर विरोधी पक्षांनी एकत्रित उमेदवार उभा केला आहे. राष्ट्रीय लोकदलाचे उमेदवार तबसून हसन यांना काँग्रेस. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. तर नागालँडमध्ये भाजपचे मंत्री एनडीएचा घटक पक्ष असलेल्या पीपल्स डेमॉक्रॅटीक फ्रंटच्या उमेदवाराला नागा पिपल्स फ्रंटच्या उमेदवारानं आव्हानं दिलं आहे. चार लोकसभा मतदारसंघासोबत कर्नाटकातील एक जागेवर मतदान होत आहे. तर देशातील विविध भागात विधानसभेच्या 9 जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे.

COMMENTS