लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आणखी एका समाजाचा महाआघाडीला पाठिंबा!

लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात आणखी एका समाजाचा महाआघाडीला पाठिंबा!

मुंबई – काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षांच्या महाआघाडीला दिवसेंदिवस पाठिंबा वाढतच आहे. कच्छ कडवा पाटीदार समाजानेही काँग्रेस महाआघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला असून  तसे पत्र काँग्रेस पक्षाला दिले आहे. मुंबई शहर, उपनगर व परिसरात कच्छ कडवा पाटीदार समाज मोठ्या संख्येने वास्तव्यास आहे. या समाजाच्या वतीने महाघाडीला पाठिंबा देण्यात आला आहे.

महाआघाडीला समाजातील विविध संघटना व पक्षांनी यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. या समाजाच्या पाठिंब्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीला मोठा फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS