लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन, एबीपी न्यूज, सी-वोटरचा सर्व्हे !

लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन, एबीपी न्यूज, सी-वोटरचा सर्व्हे !

नवी दिल्ली – आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसली असून लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. राजकीय पक्षांबरोबरच वृत्तवाहिन्या आणि काही संस्थांनी सर्व्हे केले आहेत. एबीपी न्यूज आणि सी-वोटरनं देखील आगामी लोकसभा निवडणुकीबाबतचा सर्व्हे केला असून यामध्ये भाजपला धक्का बसणार आहे. तर राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला अच्छे दिन येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला बहूमत मिळणार नसल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान 2014 मध्ये 282 जागा मिळवणा-या भाजपला केवळ 203 जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्व्हेत मांडण्यात आला आहे. तर मागच्या वेळी 44 जागा जिंकणा-या काँग्रेसला 109 जागा, भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीएला 233 जागा तर काँग्रेस प्रणित यूपीएला 167 जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच इतर प्रादेशिक पक्षांना 143 जागा मिळू शकतील असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. ही आकडेवारी पाहता कोणत्याही पक्षाला अथवा आघाडीला बहुमताचा 272 चा आकडा मिळताना दिसत नाही.

तसेच राज्यात भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या वादाचा फायदा थेट काँग्रेस- राष्ट्रवादीला होणार असल्याचा अंदाच या सर्व्हेत वर्तवण्यात आला आहे.  महाराष्ट्रात 48 जागापैकी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 28 जागा मिळतील तर एनडीएला केवळ 20 जागांवर समाधान मानावे लागणार आहे. काँग्रेसला 19, राष्ट्रवादीला 9, भाजपला 16 तर शिवसेनेला 4 जागा मिळू शकतात अंदाजही सी-वोटरनं वर्तवला आहे.

COMMENTS