आगामी लोकसभा निवडणूक, आदित्य ठाकरे विरुद्ध किरीट सोमय्या ?

आगामी लोकसभा निवडणूक, आदित्य ठाकरे विरुद्ध किरीट सोमय्या ?

मुंबई – आगामी लोकसभेची निवडणूक आदित्य ठाकरे यांनी भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात लढवावी अशी इच्छा शिवसेनेच्या नेत्या निलम गो-हे यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ईशान्य मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवावी अशी तमाम शिवसैनिकांची इच्छा असल्याचं सूचक वक्तव्य आमदार नीलम गोऱ्हे यांनी केलं आहे. याबाबत अंतिम निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील असंही गो-हे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान निलम गो-हे यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे विरुद्ध किरीट सोमय्या अशी लढत पहायला मिळणार का अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांची इच्छा पूर्ण करणार आहेत का हे पाहणं गरजेचं आहे.

 

COMMENTS