अंतर्गत सर्व्हेतही भाजपला धक्का, हिंदी पट्ट्यातील  सर्वच राज्यांतील जागा घटणार?

अंतर्गत सर्व्हेतही भाजपला धक्का, हिंदी पट्ट्यातील सर्वच राज्यांतील जागा घटणार?

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपनं एक अंतर्गत सर्व्हे केला आहे. या सर्व्हेतही भाजपला मोठा धक्का बसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. भाजपाला 2014च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत 2019च्या लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भाजपाच्या हिंदी पट्ट्यातील जवळपास सर्वच राज्यांतील जागांमध्ये घट होणार आहे. विशेष म्हणजे भाजपाला उत्तर प्रदेशमध्ये मोठं नुकसान होण्याची शक्यता या सर्व्हेत वर्तवली आहे.

दरम्यान भाजपानं केलेल्या अंतर्गत सर्व्हेनुसार, उत्तर प्रदेशात भाजपाला 51 जागांचं नुकसान होणार आहे. 2014च्या निवडणुकीत भाजपानं दमदार विजय मिळवत उत्तर प्रदेशातल्या 80 पैकी 71 जागा जिंकल्या होत्या. परंतु भाजपाच्या आताच्या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशात पक्षाला 20 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाची झालेली आघाडी ही भाजपाच्या जागा घटवण्यासाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे भाजपची चिंता वाढली असल्याचं दिसत आहे.

COMMENTS