मोदींना हरवण्यासाठी एकमेकांचे कट्टर शत्रू एकत्र, या पक्षानं काँग्रेसला दिली साथ !

मोदींना हरवण्यासाठी एकमेकांचे कट्टर शत्रू एकत्र, या पक्षानं काँग्रेसला दिली साथ !

नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आगामी लोकसभा निवडणुकीत हरवण्यासाठी एकेकाळी एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले आम आदमी पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्रित आले असल्याची माहिती आहे. या दोन्ही पक्ष दिल्लीतील सात लोकसभा जागा एकत्र लढवणार आहेत. सातपैकी तीन जागा काँग्रेस तर तीन जागा आम आदमी पक्ष लढवणार असून उर्वरित एक जागा भाजपचे माजी नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विरोधक यशवंत सिन्हा यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान दक्षिण दिल्ली, पूर्व दिल्ली आणि ईशान्य दिल्ली या मतदारसंघातून आपचे उमेदवार उभे राहणार असल्याची माहिती आहे. तर पश्चिम दिल्ली, वायव्य दिल्ली आणि चांदणी चौक या मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार उभे राहणार आहेत. तसेच राजस्थान, हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांतील लोकसभा निवडणुकीचे जागावाटपही लवकरच निश्चित केल येणार असल्याची माहिती आहे.

COMMENTS