लोकसभा निवडणूक  LIVE : राज्यात शांततेत मतदान सुरु, मतदारांचा चांगला प्रतिसाद!

लोकसभा निवडणूक LIVE : राज्यात शांततेत मतदान सुरु, मतदारांचा चांगला प्रतिसाद!

मुंबई – लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत सुरु आहे. राज्यातील  नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि, वर्धा मतदारसंघात गुरुवारी सकाळी ७ पासून मदानाला सुरुवात झाली आहे. एकूण ११६ उमेदवार रिंगणात आहेत. १ कोटी ३० लाख मतदार आहेत. त्याच्यासाठी एकूण १५ हजारपेक्षा अधिक मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण ११ हजारांवर सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

नागपूर – जिल्हा माहिती कार्यालयाची माहिती सकाळी 10 वाजेपर्यंत नागपूर लोकसभा मतदारसंघात 14 टक्के मतदान नोंदवण्यात आलं. तर भंडारा-गोंदियामध्ये 10 टक्के, चंद्रपूरमध्ये 12 टक्के, यवतमाळ-वाशिममध्ये 9 टक्के मतदान पार पडलं आहे.

गडचिरोली : महाराष्ट्र – छत्तीसगड सीमेवर मतदारांमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. छत्तीसगडमध्ये नारायणपूर जिल्ह्यातील एका मतदान केंद्राजवळ नक्षलवाद्यांनी आईडीचा स्फोट घडवून आणलाय. नारायणपूर जिल्हा हा गडचिरोलीतील भामरागड सीमेला लागून असलेला जिल्हा आहे. या दुर्घटनेत कुणीही जखमी झाल्याची माहिती नाही. केवळ दहशत पसरवण्यासाठीच हा स्फोट घडवून आणण्यात आल्याचा सुरक्षा यंत्रणेचा अंदाज आहे. परंतु, नक्षलवादाचे सावट असतानाही गडचिरोलीतील दुर्गम आणि अतिसंवेदनशील गावांमध्ये मतदानाला चांगला प्रतिसाद पहायला मिळात आहे.

भंडारा : भंडारा – गोंदिया लोकसभा क्षेत्राचे आघाडीचे उमेदवार नाना पंचबुधे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

प्रमुख लढती

 प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (नागपूर), केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर (चंद्रपूर-वणी), काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्ष चारुलता टोकस (वर्धा) यांचा समावेश आहे.

COMMENTS