काँग्रेस नेत्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन लढवणार लोकसभेची निवडणूक ?

काँग्रेस नेत्या राष्ट्रवादीत प्रवेश करुन लढवणार लोकसभेची निवडणूक ?

मुंबई – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेऊन त्याठिकाणी उमेदवारांची घोषणा केली जात आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनंही आपल्या उमेदवारांची यादी निश्चित केली आहे. काही जागांची अजून निश्चितता झाली नसल्यामुळे उमेदवारांची सध्या चाचपणी सुरु आहे. अशातच अहमदनगरमधील जागेसाठी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस आणि जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यां नगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागवडे या आपल्या समर्थकांसह लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान राजेंद्र नागवडे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रादीचे नेते अजित पवार यांची भेट घेतली असल्याची माहिती आहे. या भेटदरम्यानच अनुराधा नागवडे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राधाकृष्ण विखे-पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे-पाटील यांनी लोकसभेसाठी लावलेली फिल्डींग भेदण्यासाठीच राष्ट्रवादी सक्षम उमेदवाराच्या शोधात असल्याचं बोललं जात आहे.

COMMENTS