लोणार, सिंदखेड राजा नगरपरिषदेचा निकाल, वाचा कोणी कुठे मारली बाजी ?

लोणार, सिंदखेड राजा नगरपरिषदेचा निकाल, वाचा कोणी कुठे मारली बाजी ?

बुलढाणा – लोणार आणि सिंदखेड राजा नगरपरिषदेचा निकाल हाती आला असून लोणार नगरपरिषदेत काँग्रेसनं बाजी मारली आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या पूनम पाटोळे या विजयी झाल्या आहेत. तर नगरसेवकपदी काँग्रेस 10 आणि शिवसेना 7 जागांवर विजयी झाले असून एकूण 17 जागांसाठी ही निवडणूक घेण्यात आली होती.

तसेच सिंदखेड राजा नगर परिषदचा निवडणूक निकाल हाती आला असून नगराध्यक्ष पदी शिवसेनेचे उमेदवार सतीश तायडे विजयी झाले आहेत तर राष्ट्रवादीचा 8 जागांवर विजय झाला आहे. शिवसेना 7, भाजप 1 आणि अपक्ष 1 जागांवर विजयी झाले आहेत. एकूण 17 जागांसाठी याठिकाणी निवडणूक घेण्यात आली होती.

COMMENTS