द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी काळाच्या पडद्याआड !

द्रमुकचे सर्वेसर्वा करुणानिधी काळाच्या पडद्याआड !

नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने चेन्नईतील कावेरी रूग्णालयात उपचार सुरु असलेले द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे (द्रमुक) सर्वेसर्वो आणि तामिळनाडुचे माजी मुख्यमंत्री करूणानिधी यांचे निधन झालं आहे. ते ९४ वर्षांचे होते. सांयकाळी ६.१० वाजता करूणानिधी यांचे निधन झाल्याचे जाहीर केले. त्यांना वाचवण्यासाठी वैद्यकीय पथकाने शर्थीचे प्रयत्न केले पण वयोमानामुळे त्यांच्याकडून उपचारांना प्रतिसाद मिळू शकला नाही, असे मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटले आहे.

दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी कळताच देशभरातील राजकीय नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून हळहळ व्यक्त केली आहे. त्यांना उपचारासाठी दाखल केल्यापासून रूग्णालयाबाहेर त्यांचे चाहते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती.पटकथा लेखक ते राजकारणी असा त्यांचा प्रवास होता. तामिळ भाषेवर असलेल्या प्रभुत्वामुळे ते चित्रपटांसाठी पटकथा लिहीत असत. पटकथा लिहिता लिहिताच राजकारणामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि पाहता पाहता तामिळनाडूचे मुख्यमंत्रीही झाले. आपल्या राजकीय कारकिर्दीत एकूण ५ वेळा ते मुख्यमंत्रीपद भूषविले.

दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. देशाने एक ज्येष्ठ नेता गमावला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तामिळनाडू जनतेसाठी त्यांचे योगदान मोलाचे होतं असं ट्वीट मोदींनी केलं आहे.

COMMENTS