माढ्यात राष्ट्रवादीचा नवा डाव, भाजपचा हा बडा नेता गळाला!

माढ्यात राष्ट्रवादीचा नवा डाव, भाजपचा हा बडा नेता गळाला!

माढा – माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं भाजपला आणखी मोठा धक्का दिला आहे.  माळशिरस तालुक्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष अण्णा पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.
काही दिवसांपूर्वीच एका काँग्रेस आमदाराने भाजपला पाठिंबा दिला होता. त्याला जोरदार उत्तर देत आता राष्ट्रवादीने सुभाष पाटील यांना आपल्याकडे खेचलं आहे. त्यामुळे भाजपला माढ्यात हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान अॅड. सुभाष पाटील यांनी माढ्यातील राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. सुभाष पाटील हे मोहिते पाटील विरोधक असुन ९० च्या दशकात विजयसिंह मोहिते-पाटलांना त्यांनी घाम फोडला होता. मात्र, आता खुद्द मोहिते-पाटीलच भाजपात गेल्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचं ठरवलं आहे.

दरम्यान रणजितसिंह मोहिते पाटलांना भाजपमध्ये घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी खेळी खेळत संजय शिंदे यांना आपल्याकडे खेचले आणि उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपसमोर उमेदवारीचा प्रश्न निर्माण झाला. अखेर भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक मोठी चुरशीची होत असल्याचं दिसत आहे.

COMMENTS