माढा लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर, मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी यांना दिली उमेदवारी!

माढा लोकसभेसाठी भाजपचा उमेदवार जाहीर, मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी यांना दिली उमेदवारी!

मुंबई – माढा लोकसभा मतदारसंघात भाजपकडुन कोणाला उमेदवारी दिली जाणार याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली होती. परंतु आज अखेर माढा मतदारसंघासाठी भाजपनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. माढ्यातून रणजितसिंह निंबाळकरांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. लोकसभा उमेदवारांची आणखी एक यादी भाजपनं आज जाहीर केली असून यामध्ये माढा लोकसभा मतदारसंघात रणजितसिंह निंबाळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माढ्यात आता भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांच्यात लढत होणार आहे.

दरम्यान गेली काही दिवसांपासून माढा लोकसभा मतदारसंघात उमेदवारीचा तिढा पहावयास मिळाला. भाजपकडून माढ्यात राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता होती. मात्र भाजपने मोहिते पाटील पिता पुत्रांऐवजी तिसऱ्याच उमेदवाराला तिकीट जाहीर केलं आहे.काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी मोहिते पाटील पिता पुत्रांना तयार राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विजयसिंह किंवा रणजितसिंह या दोघांपैकी एकाला उमेदवारी मिळणार हे जवळपास स्पष्ट होतं. पण आज अचानक सर्व अंदाज खोटे ठरवत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली आहे.

COMMENTS