…तर मी राजकारण सोडून देणार – संजय शिंदे

…तर मी राजकारण सोडून देणार – संजय शिंदे

पंढरपूर – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माढ्यात दावे प्रतिदावे केले जात आहेत. याठिकाणी कुणाला लीड मिळणार यावरून आघाडी आणि युतीतील नेत्यांकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना माळशिरस तालुक्यातून एक लाख मताचे लीड देणार असल्याचं वक्तव्य माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केलं आहे.

दरम्यान मोहीते पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार संजय शिंदे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. मोहिते पाटील यांनी माळशिरस मधून एक लाख मताचे लीड भाजपला दिल्यास मी राजकारणच सोडून देतो असं वक्तव्य संजय शिंदे यांनी केलं आहे. यावरुन माढ्यात चांगलच राजकीय वातावरण तापलं असल्याचं दिसत आहे.

COMMENTS